![]() |
"देश के गद्दारो को गोली मारो" अनुराग ठाकूर यांच्या विधानवरून राजकारणात खळबळ |
नागरिकत्व सुधारणा कायदा(CAB) आणि एनआरसी(NRC) विरोधात देशभरात ठिकठिकाणी विरोध प्रदर्शन होत असताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे वादग्रस्त विधान समोर आलं आहे. निवडणुकीच्या रॅलीमध्ये भाषण करताना अनुराग ठाकूर यांनी भडकाऊ भाषण केल्याचा आरोप विरोधकांनी लावला आहे. अनुराग ठाकूर मंचावरुन भाषण करताना देश के गद्दारो को अशी घोषणा देताना लोकांमधून गोली मारो ... को अशा प्रतिघोषणा देण्यात येत होत्या.
अनुराग ठाकूर यांच्या विधानानंतर सोशल मीडियावर हॅशटॅग गद्दार असा ट्रेंड सुरु आहे. याबाबत ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ट्विट करुन अनुराग ठाकूर यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोकांना भडकवण्याचे काम करणाऱ्यांना जेलमध्ये असायला हवं त्याऐवजी अनुराग हे मोदी सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.
रिठाला येथील भाजपा उमेदवार मनिष चौधरी यांच्या समर्थनार्थ मंत्री अनुराग ठाकूर यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शाहीनबाग येथे सुरु असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. यामध्ये देशविरोधी घोषणाबाजी केली जात असल्याचा आरोप भाजपाने केला. तर देशातील शांतता बिघडवण्यासाठी भाजपा नेते काम करतायेत असा आरोप काँग्रेसचे नेते किर्ती आझाद यांनी केला आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment