![]() |
महाराष्ट्र शासनने पण उपाययोजना चालू केल्या आहेत |
चीनमध्ये साथ आलेल्या कोरोना वायरसबाबत (ज्याला वुहान वायरसही म्हटलं जातं) आता भारतातही दक्षता बाळगली जात आहे.
सार्स प्रकारातला कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. 2002 साली चीनमध्ये 8,098 लोकांना सार्स विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 774 लोकांचा मृत्यू झाला होता.
महाराष्ट्र शासनने पण उपाययोजना चालू केल्या आहेत.
राजधानी दिल्लीसह मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोच्ची आणि कोलकाताच्या विमानतळांवर थर्मल स्क्रिंनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. चीन आणि हाँगकाँगहून परतलेल्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. तसंच प्रवाशांना विमानात चढण्याआधी सेल्फ रिपोर्टिंग फॉर्म भरावा लागेल.
कोरोना विषाणू आहे काय?
रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना वायरस असल्याचं सांगितलं.
कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे.
या नव्या कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचं विश्लेषण करण्यात आलं. कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचं संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात आढळलं आहे.कोरोना विषाणू किती गंभीर आहे?
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे सर्दी-खोकला अशी लक्षणं दिसतात. मात्र, लागण गंभीर असेल तर मृत्यूही ओढावू शकतो.
युनिवर्सिटी ऑफ एडिनबर्गमध्ये प्राध्यापक असलेले मार्क वूलहाऊस म्हणतात, "हा नवीन कोरोना विषाणू आम्हाला आढळला तेव्हा आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की त्याचा परिणाम इतका घातक का आहे. सर्दीची सामान्य लक्षणं यात दिसत नाही. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे."
कोरोना विषाणू आला कुठून?
कोरोना विषाणू आला कुठून?
हा विषाणुचा नवीन प्रकार आहे. हे प्राण्यांच्या एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संक्रमित होतात आणि त्यानंतर मानवालाही संसर्ग होतो. या संक्रमणावस्थेच्या काळात त्याचा शोध लागत नाही.
नॉटिंगम युनिवर्सिटीत वायरोलॉजीचे प्राध्यापक असलेले जोनाथ बॉल यांच्या मते, "हा अगदी नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आहे. या विषाणूची लागण प्राण्यांमधूनच माणसाला झाली असावी, अशी दाट शक्यता आहे."
सार्स हा विषाणू मांजरातून माणसांत आला होता. मात्र, या विषाणूचा मूळ स्रोत कोणता आहे, याची अधिकृत माहिती चीनने अजून दिलेली नाही.

विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे का?
या विषाणूचा परिणाम मर्यादित असेल, असं सुरुवातीला वाटलं होतं. मात्र, डिसेंबर नंतर अनेक प्रकरणं पुढे आली.
या संसर्गाची सुरुवात चीनमधल्या वुहान शहरातून झाली. मात्र, आता या विषाणुचा फैलाव चीनमध्यल्या इतर शहरात आणि चीनबाहेरही झालेला आहे.
थायलंड, जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियातही कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. वुहान शहरातून आलेले लोक कोरोनाग्रस्त असण्याची शक्यता जास्त आहे.
कोरोनाची लागण झालेल्या सर्वच लोकांची ओळख पटली आहे, असं गरजेचं नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
लक्षण श्वास घ्यायला त्रास होणे
>> न्यूमोनिया
>> अतिसार
>> काही रुग्णांमध्ये मुत्रपिंड निकामी होणं
>> प्रतिकारशक्ती कमी होणं
घ्याची काळजी
- नियमित कोमट पाणी आणि साबणाने हात धुणे
- शक्य तेवढं डोळे आणि नाकांना स्पर्श करणे टाळणे
- सदृढ आणि फिट जीवनशैली अंगीकारणे
0 comments:
Post a Comment
Please add comment