अक्षय कुमारचा नवा लूक


अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचा नवा लूक पाहाल तर थक्क व्हाल. होय, या चित्रपटाचा नवा लूक प्रदर्शित झाला आणि अक्षयचा ‘किलर’ अवतार पाहून सगळेच चकीत झालेत. वाढलेली दाढी, जबरदस्त बॉडी, गळ्यातील सोनसाखळ्या आणि भयावह डोळे असा त्याचा अवतार आहे. या लूकमध्ये अक्षय कुमार अंत्यंत हटके अंदाजात दिसत आहे. त्याचा हा हटके लूक व्हायरल झाला आणि चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली. ‘नवा लूक, नवी रिलीज डेट’ असे त्याने हा लूक शेअर करताना लिहिले आहे. ‘बच्चन पांडे’ हा सिनेमा आता 22 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. 

आधी हा सिनेमा 2020 मध्ये नाताळच्या मुहूर्तावर रिलीज होणार होता. पण असे झाले असते तर आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’सोबत या सिनेमाचा बॉक्स ऑफिस संघर्ष अटळ होता. त्यामुळे आमिरने अक्षयला ‘बच्चन पांडे’ची रिलीज डेट बदलण्याची विनंती केली होती. आमिरच्या शब्दाखातर अक्षयने आपल्या चित्रपटाची रिलीज डेट बदलली. विशेष म्हणजे, यामुळे अक्षयला त्याच्याच आणखी एका चित्रपटाची रिलीज डेटही बदलावी लागली. होय, आता त्याचा ‘बेल बॉटम’ हा सिनेमाही 22 जानेवारीला नाही तर 2 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होईल.  
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment