मंत्र्यांच्या गाडीचे टायर बदलण्यापूर्वी सरकार बदलेल :चंद्रकांत पाटील

मंत्र्यांच्या गाडीचे टायर बदलण्यापूर्वी सरकार बदलेल :चंद्रकांत पाटील

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवून बहुमत मिळवले होते, याकडे लक्ष वेधत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने अनैतिक युती करुन सरकार स्थापन केल्याची टीका केली. ते म्हणाले, 'एकत्रित निवडणूक लढवताना शिवसेनेने युतीला मतदान मागितले होते. युतीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे मते मागितली होती. पण निवडणुकीनंतर ज्यांच्या विरोधात मते मागितली त्यांच्याबरोबर सत्ता स्थापन केली.' ठाकरे जरी मुख्यमंत्री असले तरी शरद पवारच निर्णय घेतात, असा दावा पाटील यांनी केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सुट्टी द्यायची, भास्कर जाधव, तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात घ्यायचे नाही. सर्वाधिक निधी असणारी खाती राष्ट्रवादीकडे तर कमी निधी असणारी खाती शिवसेना आणि काँग्रेसला दिली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.


राज्याच्या निवडणुकीत शरद पवारांना आज अखेर कधीही शंभर आमदार निवडून आणता आले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. भाजपने २०१४ मध्ये १२१ तर २०१९ मध्ये १०५ आमदार निवडून आणले आहेत. रात्रीनंतर दिवस येत असतो. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे. भाजप कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात रस्त्यांवर संघर्ष करावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.

'सोनिया गांधी यांच्या नावाने शपथ घेणाऱ्या मुलाबद्दल हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना काय वाटत असेल?' अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मंत्र्यांच्या गाडीचे टायर बदलण्यापूर्वी हे सरकार बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजप महानगरअध्यक्ष निवड प्रक्रियेवेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment