![]() |
दिल्लीतील शाहीनबाग येथे आंदोलनासाठी बसलेले बहुतांश लोक हे बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आले आहेत - भाजपा नेते राहुल सिन्हा |
दिल्लीतील शाहीनबाग येथे सीएएविरोधात आंदोलन सुरू आहे. भाजपा नेते राहुल सिन्हा यांनी शाहीनबाग येथील आंदोलनातील लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी असल्याचं म्हटलं आहे. 'दिल्लीतील शाहीनबाग येथे आंदोलनासाठी बसलेले बहुतांश लोक हे बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आले आहेत' असं वादग्रस्त विधान सिन्हा यांनी केलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शाहीनबाग आंदोलनावर टीका केली आहे. शाहीनबाग येथे सुरू असलेले आंदोलन नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात नसून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आहे. या कायद्यावरून जनतेची दिशाभूल केली जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रचलेला हा डाव आहे. त्यामुळे शाहीनबाग हा देशाला तोडणारा मंच आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शाहीनबाग आंदोलनावर टीका केली आहे. सोमवारी (27 जानेवारी) एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
0 comments:
Post a Comment
Please add comment