भाजपमध्ये प्रचंड राडा ,सत्ता नसल्यास काय होउ शकते बघा

सत्ता  नसल्यास  काय  होउ  शकते  बघा 

भाजप जिल्हाध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी दुपारी संत बाबा हरदासराम मंगल कार्यालयात सभा हाेती. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, आ. सुजितसिंह ठाकूर, खा. रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित हाेते.
भाजप जिल्हाध्यक्ष निवडीसाठी जळगावात आयोजित केलेल्या सभेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमाेरच राडा झाला. भुसावळ येथील नाराज कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर जात सूत्रसंचालन करणाऱ्या खडसे समर्थक व भाजप जिल्हा सरचिटणीस डाॅ. सुनील नेवे यांच्या ताेंडाला काळे फासून त्याना खाली पाडले आणि लाथांनी तुडवले. अमळनेरच्या सभेची पुनरावृत्ती हाेत असल्याचे जाणवताच मंत्री दानवेंनी सभेतून काढता पाय घेतला. संतप्त कार्यकर्त्यांनी फेकलेली शाई अंगावर पडल्याने दानवे सभेतून निघून गेले. वातावरण निवळल्यानंतर तासाभराने ते पुन्हा दाखल झाले.
पुण्याला गेलेले एकनाथ खडसे बैठकीला नव्हते. जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू हाेताच भुसावळ येथील कार्यकर्ते व्यासपीठावर चढले. प्रा. नेवे दिसताच त्यांच्या अंगावर शाई फेकून त्यांना खाली पाडले. काहींनी त्यांना लाथांनी तुडवले. सभागृहात गाेंधळ उडाला. याच वेळी गिरीश महाजनांसह पदाधिकारी नेवे यांच्या बचावासाठी सरसावले. कार्यकर्त्यांनी फेकलेली शाई अंगावर पडल्याने केंद्रीय मंत्री दानवे यांनी गर्दीतून थेट बाहेर पडणे पसंत केले. महाजनांच्या मध्यस्थीनंतर खा. हरिभाऊ जावळे यांची जिल्हाध्यक्षपदी बिनविराेध निवड झाली.
चालून अालेल्या जमावाला नियंत्रीत करण्यासाठी आमदार  गिरीश महाजन यांनी पुढे येऊन माइकचा ताबा घेतला. सर्वांना त्यांनी व्यासपीठाखाली ढकलून स्वत: ते खाली उतरले. तब्बल तासाभराने हा गाेंधळ नियंत्रणात अाला. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. विजय धांडे यांनी मंत्री दानवेंच्या अनुपस्थितीत जिल्हाध्यक्ष निवडीची पुढची प्रक्रिया सुरू केली. सर्व इच्छुकांची मते जाणून घेतल्यानंतर महाजन यांनी मंत्री दानवेंना सभागृहात येण्यासाठी फाेन केला. दुपारी २ वाजून १० मिनिटांनी बाहेर पडलेले दानवे ३ वाजता सभागृहात पाेहाेचले.
मंत्री दानवे आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे कार्यकर्त्यांना खाली बसण्याच्या सूचना करीत असताना त्यातील काहींनी थेट व्यासपीठावर उडी घेऊन प्रा. नेवे यांच्या ताेंडाला शाई फासली. त्याच्या पाठाेपाठ अाणखी तीन कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर धाव घेतली. नेत्यांना काही कळण्याअाधीच प्रा.नेवेंना खाली पाडून लाथांनी तुडवले. कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत प्रा. नेवे यांचा चष्मा फुटला. अामदार गिरीश महाजन यांनी पुढे येऊन प्रा. नेवेंचा बचाव केला. जिल्हा परिषद सदस्य पाेपट भाेळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, अशाेक कांडेलकरांनी सर्वांना अावरले.
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यात गटबाजीने संघटन ढासळत अाहे. त्यातच राज्यात सत्ता नसल्याने संघटनेत गटबाजी वाढू नये म्हणून संयमी माजी खासदार हरिभाऊ जावळे यांची जिल्हाध्यक्षपदी बिनविराेध निवड झाली. प्रदेशाध्यक्ष अामदार चंद्रकांत पाटील हे जावळेंसाठी अाग्रही हाेते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी अायाेजित भाजप जिल्हाध्यक्ष निवडीच्या सभेला माजी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, अामदार सुजितसिंग ठाकूर, आमदार  स्मिता वाघ, अामदार चंदुलाल पटेल, अामदार सुरेश भाेळे, आमदार  संजय सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, डाॅ. विजय धांडे, डाॅ. राजेंद्र फडके, प्रदेश उपाध्यक्ष अशाेक कांडेलकर, माजी आमदार  हरिभाऊ जावळे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी व पदाधिकारी उपस्थित हाेते. जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक म्हणून मधुकर काटे, अजय भाेळे, पी. सी. पाटील, गाेविंद अग्रवाल, बाबुराव घाेंगडे, डाॅ. संजीव पाटील, पाेपट भाेळे, डाॅ. महेंद्र राठाेड, उदयभान पाटील, के. बी. साळुंखे, उद्धव माळी, दिलीप खाेडपे, कमलाकर राेटे, डी. एम. पाटील, पद्माकर महाजन, डाॅ. दीपक पाटील व माजी खासदार हरिभाऊ जावळे हे इच्छुक हाेते. यांच्यापैकी ९ जणांनी माघार घेतली तर ९ जणांना चर्चेसाठी एका खाेलीत एकत्रित बसवण्यात अाले. दीड तास चाललेल्या चर्चेनंतर ८ जणांनी माघार घेतल्याने हरिभाऊ जावळे यांची बिनविराेध जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर झाली.
हरिभाऊ जावळे यांनी चार वेळा रावेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. त्यापैकी दाेन वेळा विधानसभेवर आमदार  म्हणून निवडून आले . तर दाेन वेळा लाेकसभा निवडणूक लढवली. त्यात दाेन्ही वेळा खासदार म्हणून निवडून  आले . सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. सध्या राज्याच्या कृषी व संशाेधन परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती आहे 
हे ठरले नाराजीचे  कारण...
भुसावळ येथील शहर अध्यक्षांच्या निवडीत एकनाथ खडसे यांचे समर्थक असलेल्या प्रा. डाॅ. सुनील नेवे यांनी मनमानी करत बाहेरच्या व्यक्तीची निवड केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप होता. ४० ते ५० कार्यकर्ते यासाठी व्यासपीठाखाली उभे राहून व्यासपीठावर असलेले मंत्री दानवे अाणि गिरीश महाजन यांच्यांशी चर्चा करत होते. यादरम्यान काही कार्यकर्ते व्यासपीठावर गेले. प्रा.नेवे समाेर दिसताच त्यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकली.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा हाेता आग्रही सत्ता नसताना पक्षात समन्वय राहावा म्हणून माजी खासदार हरिभाऊ जावळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. स्पर्धक वाढल्याने व कुणीही माघार घेण्यास तयार नसल्याने हरिभाऊ यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली. परंतु, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या नावाचा अाग्रह धरला हाेता. जावळेंनी माघार घेण्याची तयारी दर्शवताच स्पर्धेतील अन्य इच्छुकांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. 
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment