दहशतवाद हा अमेरिकेच्या आक्रमक स्टाइलनुसारच संपुष्टात आणला जाऊ शकतो :बिपीन रावत

दहशतवाद हा अमेरिकेच्या आक्रमक स्टाइलनुसारच संपुष्टात आणला जाऊ शकतो


जगातून दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची गरज असल्याचं मत देशाचे पहिले सरसेनाप्रमुख (सीडीएस) बिपीन रावत यांनी व्यक्त केलं आहे. 'दहशतवाद हा अमेरिकेच्या आक्रमक स्टाइलनुसारच संपुष्टात आणला जाऊ शकतो', असं विधान रावत यांनी नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात केलं आहे.

कट्टरतावाद आणि काश्मीरमध्ये पॅलेट गनचा वापर अशा गंभीर प्रश्नांवरही रावत यांनी भाष्य केलं. 'दहशतवाद संपुष्टात आणणं अत्यंत गरजेचं आहे. अमेरिकेने ९/११ हल्ल्यानंतर ज्यापद्धतीने आक्रमक भूमिका घेत जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधात युद्ध पुकारलं. त्याच पद्धतीनं सर्व देशांनी दहशतवादाविरोधात लढायला हवं', असं बिपीन रावत म्हणाले.

शाळा, कॉलेजेसमध्ये कट्टरतावादी घडतात
शाळा, विद्यापीठांसोबत धार्मिक ठिकाणी कट्टरतावादाचं शिक्षण देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची गरज असल्याचं रावत म्हणाले. कट्टरतवाद पसरवणाऱ्यांची दुखती नस शोधून त्यांच्यावर कारवाई केली तर देशातून कट्टरतवादाचाही नायनाट होऊ शकतो, असं मत रावत यांनी व्यक्त केलं.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment