बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च

बजाजने अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मंगळवारी आपल्या चेतक इलेक्ट्रीक स्कूटरला लॉन्च केले आहे. या नव्या स्कूटरची एक्स-शोरूम किमंत एक लाख रुपये आहे. कंपनीने याला अर्बन आणि प्रीमियम अशा दोन व्हॅरिएंटमध्ये आणले आहे. तर, सायबर व्हाइट, हेजल्नट, सिट्रस रश, वैल्यूटो रोजो, इंडिगो मेटेलिक आणि ब्रुक्लन ब्लॅक अशा 6 कलर व्हॅरिएंटमध्य आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची प्री-बुकिंग 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पण, डिलीव्हरी फेब्रुवारीमध्ये मिळेल.


95+ किलोमीटरची रेंज
बजाज चेतक इलेक्ट्रिकमध्ये 3 किलोवॉटची बॅटरी आणि 4080 वॉटची मोटर दिली आहे. ही 16Nm टॉर्क जनेरट करते. बॅटरी आणि मोटरीला IP67 रेटिंग दिली आहे, म्हणजेच ही गाडी डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ आहे. कंपनीचा दावा आहे की, 5 तासात स्कूटरची बॅटरी फूल चार्ज होते.
स्कूटरमध्ये ईको आणि स्पोर्ट असे दोन ड्राइविंग मोड आहेत. फुल चार्ज झाल्यावर ईको मोडमध्ये 95 किलोमीटरपर्यंत गाडी चालेल तर स्पोर्ट मोडमध्ये 85 किलोमीटरची रेंज आहे. स्कूटरसोबत चार्जर मोफत दिले जाईल तर फास्ट DC चार्जरला कंपनी तुमच्या घरी येईन इंस्टॉल करुन देईल.
रिव्हर्स गिअर आणि 3 वर्षांची वॉरेंटी
यात रिव्हर्स ड्रायविंग फीचरदेखील मिळेल. या फीचरमुळे महिलांसाठी गाडी चालवणे सोपे जाईल. बजाजने स्कूटरला सर्वात आधी पुण्यात लॉन्च केले आहे. लवकरच बंगळुरू, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबादसारख्या शहरातही लॉन्च केले जाईल. कंपनी या स्कूटरवर 3 वर्षे किंवा 50 हजार किलोमीटरची वॉरेंटी देत आहे.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment