निरोगी शरीरासाठी अवश्य करून पाहा हे सोपे उपाय

दररोज डाळिंबाचे सेवन केल्यास अकाली वृद्धत्व येत नाही।


धावपळीच्या जीवनामुळे अनेक तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून यांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. वेळेआधीच केस पांढरे होणे, अशक्तपणा, लवकर थकवा येणे, सांधेदुखी, दृष्टिदोष यासारख्या आजाराचा सामना करावा लागतो. या आजारांपासून दूर राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत.
दररोज करा हे उपाय : आवळ्याचा रस, गायीचे तूप, मध व मिश्री (बारीक खडीसाखर) प्रत्येकी १५-१५ ग्रॅम घेऊन मिश्रण तयार करा. सकाळी उपाशीपोटी या मिश्रणाचे सेवन करावे. चुर्ण खाल्ल्यावर दोन तासापर्यंत काहीच खाऊ नये. दररोज याचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या रोगांपासून दूर राहू शकता. यामुळे तारुण्यावस्था दीर्घकाळ टिकवते.
लसूण : शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी रोज रात्री झोपण्याआधी लसणाच्या दोन पाकळ्या खाव्यात आणि त्यानंतर थोडे पाणी प्यावे. असे नियमित केल्याने अशक्तपणाच्या समस्येपासून तुम्ही लवकर बाहेर याल.
डाळिंब : दररोज डाळिंबाचे सेवन केल्यास अकाली वृद्धत्व येत नाही, तारुण्यावस्था दीर्घकाळ टिकून राहते. डाळिंबाचे सेवन रक्ताशी संबंधित अनेक आजारांपासून शरीराला वाचवते तसेच रक्तातील कमतरता दूर करण्यासाठी याचा फायदा होतो. मात्र हा उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
संतुलित आहार घ्या : दररोज संतुलित आहार घ्यावा. आहार असा घ्या जो पचण्यास हलका असावा. आहार असा घ्या ज्यामुळे शरीराच्या पाचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ नये. खाण्यात व्हिटॅमिन, प्रोटीन आणि खनिज तत्वांचे जास्तीत जास्त प्रमाण हवे. बाहेरचे खाद्य, तेल, तूप, आणि गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवा.
तणावापासून दूर राहा... : जी व्यक्ती जास्त विचार करते आणि खूप ताण घेते, अशा व्यक्तीला अनेक आजार तारुण्यावस्थेतच व्हायला लागतात. जर मानसिक त्रास जास्त असेल तर चांगल्या मित्रांमध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ घालवा. चांगले संगीत ऐका, चांगली पुस्तके वाचा, यामुळे तुमचा मानसिक ताण दूर होण्यास मदत होईल.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment