ऑस्ट्रेलिया: १० हजार उंटांना गोळ्या घालून केले ठार

ऑस्ट्रेलिया: १० हजार उंटांना गोळ्या घालून केले ठार


मेलबर्न: ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेली भीषण आग अजूनही सुरूच पाण्याची समस्यानेही उग्र रूप धारण केले आहे. उंट जास्त पाणी पितात म्हणून पाण्यासाठी ऑस्ट्रेलियात १० हजार उंटांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियातील या भीषण आगीत आतारर्यंत ५० कोटींपेक्षा अधिक वन्य जीवांचा बळी गेला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे उंट मानवी वस्तीत येऊन पाण्याचा साठा संपवत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. या मुळे लोकांना उंटांचा मोठा त्रास होऊ लागला होता. याची दखल घेत तेथील प्रशासनाने व्यावसायिक शुटर्सना या उंटांना गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश दिले. या व्यावसायिक शूटर्सनी हेलिकॉप्टर्समधून उंटाना गोळ्या घालून ठार केले.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment