![]() |
औरंगाबाद / जिल्हा परिषद सभापतिपद निवडणुकीत भाजप-सेना युती. |
३ जानेवारी रोजी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा विरोध डावलून काँग्रेसच्या मीना शेळके यांना अध्यक्ष करण्यात शिवसेनेने महत्वाची भूमिका बजावली. समसमान मते मिळाल्याने िचठ्ठी काढून शेळके यांना विजयी घोषित करण्यात आले होते. शिवसेनेच्याच अॅड. देवयानी डोणगावकर यांना त्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचीच पुनरावृत्ती १४ जानेवारीला सभापतिपदाच्या निवडणुकीतही झाली. समिती सभापतिपदाच्या दोन जागांसाठी मतदान झाले. त्यात सेनेचे अविनाश बलांडे आणि अब्दुल सत्तार समर्थक किशोर बलांडे प्रत्येकी ६० मते घेऊन विजयी झाले. काँग्रेसचे श्रीराम महाजन यांनी स्वत:लाही मतदान केले नाही. आ. प्रशांत बंब यांनी काही दिवसांपूर्वी अध्यक्षपदाची पुनरावृत्ती होणार नाही. सभापतिपदासाठी शिवसेना-भाजप एकत्र असतील, असे म्हटले होते. त्यांचे म्हणणे त्यांनी सत्तार यांच्या मदतीने प्रत्यक्षात आणले.
राज्यातील महाविकास आघाडीने दीड आठवड्यापूर्वी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पटकावले. ११ दिवसांतच आघाडीवर संक्रांत आली. सभापतिपद निवडणुकीत शिवसेनेने तीन तर भाजपने एक सभापितपद पटकावले. शिवसेनेने विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
यांना मिळाली पदे
किमान दोन सभापती काँग्रेसचे असतील असे म्हटले जात होते. प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजप युती झाली. नेत्यांनी व्हीप बजावलाच नाही. त्यामुळे भाजपच्या अनुराधा चव्हाण महिला व बालकल्याण सभापती झाल्या. समाजकल्याण सभापतिपदी शिवसेनेच्या मोनाली राठोड बिनविरोध निवडून आल्या.
0 comments:
Post a Comment
Please add comment