औरंगाबादच्या MD डॉक्टरने इंजेक्शन घेऊन केली आत्महत्या


औरंगाबाद 06 जानेवारी : औरंगाबाद इथल्या प्रसिद्ध घाटी रुग्णालयाला हादरविणारी घटना आज घडलीय. या हॉस्पिटमधले प्रतिथयश डॉक्टर शेषाद्री गौडा यांनीं आज आत्महत्या केलीय. गौडा यांनी याच हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेतलं होतं. MD Medicine असलेले डॉक्टर गौडा हे गोल्ड मेडलिस्ट होते. अतिशय हुशार आणि मनमिळावू अशी त्यांची ख्याती होती. असा लौकीक असतानाही त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
गौडा यांनी औरंगाबाद मधल्या राहत्या घरी इंजेक्शन घेतली आणि आपलं आयुष्य संपवलं. डॉक्टरने नेमकी का आत्महत्या केली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment