अ‍ॅपल, अ‍ॅमेझाॅन आणि मायक्राेसाॅफ्टनंतर अल्फाबेटही १ लाख काेटी डाॅलरच्या एलिट क्लबमध्ये

अ‍ॅपल, अ‍ॅमेझाॅन आणि मायक्राेसाॅफ्टनंतर अल्फाबेटही १ लाख काेटी डाॅलरच्या एलिट क्लबमध्ये


अ‍ॅपल, अ‍ॅमेझाॅन आणि मायक्राेसाॅफ्टनंतर अल्फाबेटही १ लाख काेटी डाॅलरच्या एलिट क्लबमध्ये
च्या काळात हे यश प्राप्त केल. मायक्राेसाॅफ्टने गेल्या वर्षी भारतीय वंशाचे सत्या नाडेलांच्या काळात १ लाख काेटी डाॅलरचा आकडा पार केला हाेता.

अमेरिकेतील टेक कंपनी अल्फाबेटने गुरुवारी एक ट्रिलियन डाॅलर (१ लाख काेटी डाॅलर वा सुमारे ७१ लाख काेटी रु.) बाजार भांडवलाचा आकडा पार केला आहे. गुगलची पॅरंट कंपनी अल्फाबेट हा आकडा स्पर्श करणारी अमेरिकेतील चाैथी आणि जगातील सहावी कंपनी झाली आहे. अमेरिकी कंपन्यांमध्ये अ‍ॅपल, अ‍ॅमेझाॅन आणि मायक्राेसाॅफ्टनी याआधीच यश प्राप्त केले आहे. या वेळी अ‍ॅमेझाॅनचे बाजार भांडवल १ लाख काेटी डाॅलरपेक्षा कमी झाले आहे. याशिवाय चीनची पेट्राे चायना आणि साैदी अरेबियाची साैदी अरामकाेही १ लाख काेटी डाॅलर बाजार भांडवलाचा आकडा ओलांडला आहे. अल्फाबेट दुसरी अशी कंपनी आहे, जिने भारतीय सीई

  • अ‍ॅपल आणि अ‍ॅमेझॉनने २०१८ मध्ये, मायक्रोसॉफ्टने २०१९ मध्ये १ ट्रिलियन डॉलर आकडा पार केला.
  • नाडेलांच्या कार्यकाळात मायक्राेसाॅफ्ट १ लाख कोटी डॉलरची कंपनी
  • पिचाई २०१५ मध्ये गुगलचे सीईओ झाले, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अल्फाबेटची जबाबदारी
  • पिचाई सीईओ झाल्यानंतर १२% वाढले बाजार मूल्य
अल्फाबेटच्या महसुलाच्या ८५% हिस्सा गुगलमधून, पिचाई गुगलचे बॉस
अल्फाबेटच्या समभागांत गुरुवारी ०.८% तेजी आल्याने मूल्य वाढले. भारतीय वंशाचे सुंदर पिचई(४७) सीईओ झाल्यानंतर दीड महिन्यांत अल्फाबेटच्या मूल्यात १२% वाढ झाली. पिचाई ४ डिसेंबरला सीईओ झाले हाेते. त्या दिवशी अल्फाबेट ८९३ अब्ज डाॅलर(६४ लाख काेटी रु.)वर हाेती. अल्फाबेटचा ८५% महसूल गुगलमधून येताे. पिचाई २०१५ पासून गुगलचे सीईओ आहेत.
मूल्यामध्ये टाॅप-४ अमेरिकी कंपन्या
कंपनी : बाजार भांडवल(डाॅलर) : बाजार भांडवल(रु) अ‍ॅपल : 1.4 लाख कोटी : 99.4 लाख कोटी
मायक्राेसाॅफ्ट : 1.3 लाख कोटी : 92.3 लाख कोटी
अल्फाबेट : 1 लाख कोटी : 71.0 लाख कोटी
अ‍ॅमेझाॅन : 0.931 लाख कोटी : 66.1 लाख कोटी
तीन अमेरिकी कंपन्यांचे बाजार भांडवल भारताच्या जीडीपीपेक्षा ३६% जास्त
अमेरिका जगातील सर्वात माेठी अर्थव्यवस्था आहे. याचा अंदाज तेथील तीन सर्वात माेठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलातून येऊ शकताे. अ‍ॅपल, मायक्राेसाॅफ्ट आणि अ‍ॅमेझाॅनचे एकूण बाजार भांडवल ३.७ लाख काेटी डाॅलर आहे. वर्ल्ड बँकेच्या २०१८ च्या आकडेवारीनुसार भारताचा जीडीपी २.७१९ लाख काेटी डाॅलर आहे. अशा पद्धतीने चार अव्वल अमेरिकी कंपन्यांचे बाजार भांडवल भारताच्या जीडीपीपेक्षा ३६% जास्त आहे.
सौदी अरेबियाची कंपनी अरामकोचे बाजार भांडवल सर्वाधिक १.८ लाख कोटी डॉलर
साैदी अरेबियातील पेट्राेलियम कंपनी साैदी अरामकाे बाजार भांडवल प्रकरणात जगातील सर्वात माेठी कंपनी आहे. अरामकाेचे बाजार भांडवल सध्या १.८ लाख काेटी डाॅलर आहे. गेल्या महिन्यात २ लाख काेटी डाॅलरची जगातील ही पहिली कंपनी झाली हाेती. अमेरिका-इराण यांच्यातील तणावादम्यान अरामकाेचे समभाग काेसळल्यानंतर कंपनीच्या मूल्यात घट आली.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment