![]() |
या'अॅपने फक्त अंगठ्याच्या ठशाने करता येणार पेमेंट! |
आजच्या युगात डिजिटल पेमेंट करण्याचे प्रमाण काही दिवसात वाढले आहे. यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करतात. डिजिटल पेमेंटसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने भीम आधार अॅप लॉन्च केले आहे.
त्याच्या मदतीने विना कार्ड व यूपीआयचे फक्त अंगठ्याच्या ठशाने पेमेंट करत येते. याचा फायदा ग्राहकांबरोबरच दुकानदारांना देखील होणार आहे. एसबीआयच्या या अॅपद्वारे फक्त आधारकार्डच्या नंबरद्वारे पेमेंट करता येते.
या अॅपच्या वापरासाठी दुकानदार यावर रजिस्टर्ड असणे गरजेचे आहे. नोंदणी करण्यासाठी दुकानदाराला नाव, पत्ता, फोन नंबरसह इतर माहितीसह बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.
बँक खाते हे आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे. रजिस्टर केल्यानंतर दुकानदाराला ग्राहकाकडून पेमेंट घेण्यासाठी मशीन दिली जाणार आहे. त्यात ग्राहकांचे फिंगरप्रिंट घेतले जाणार आहे.
हे STQC सर्टिफाइड FP स्कॅनर असेल, जे दुकानदाराच्या अँड्राईड अॅपशी कनेक्ट असणार आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment