भारताचे माजी राष्ट्रपती तसेच 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाणारे दिवंगत शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे.
चित्रपटाविषयी..: या बायोपिकमध्ये डॉ. कलाम यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते परेश रावल साकारणार आहेत. त्यांनी स्वतः या संदर्भात त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून ही माहिती दिली असून मिसाईल मॅन कलाम यांचा उल्लेख संत कलाम असा केला आहे. कलमांची भूमिका साकारायला मिळणे हे माझ्यासाठी भाग्यशाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वी रावल यांनी पंतप्रधान मोदी यांची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र ती भूमिका अभिनेता विवेक ओबेरायला मिळाल्यामुळे रावल यांची इच्छा पूर्ण झाली नाही.
दरम्यान, रावल गेल्या लोकसभेत अहमदाबाद मतदारसंघातून भाजपचे खासदार होते. यावेळी मात्र रावल यांनी निवडणुक न लढवता पूर्ण लक्ष अभिनयावर केंद्रित केले आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment