![]() |
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध |
पुण्यातील प्रसिद्ध येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झालं आहे. केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेच्या अहवालात या चहामध्ये भेसळ असल्याचे समोर आलं आहे.
एफडीएने येवले फूड प्रॉडक्टची तपासणी केली असता चहामध्ये रंग टाकण्यात येत असल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत रंगाचा वापर करणे चुकीचे आहे.
या पूर्वीही कारवाई : येवले चहावर यापूर्वी देखील अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत चहाच्या मालाचे काही नमुने जप्त केले होते.
अहवाल : या जप्त मालाचा पहिला अहवाल चांगला आला होता. मात्र दुसऱ्या अहवालामध्ये सिथेंटिक फूड कलर आढळून आला आहे. या फूड कलरमुळे चहाला लाल रंग येतो.
0 comments:
Post a Comment
Please add comment