आता शाळेत वाजणार ३ वेळा वॉटरबेल

आता शाळेत वाजणार ३ वेळा वॉटरबेल 
राज्यातील शाळांमध्ये आता वॉटर बेल उपक्रम राबवण्यात येणार आहे. मुलं शाळेत दिवसातील 5 ते 7 तास असतात. या काळात त्यांना दीड ते दोन लीटर पाणी पिणं आवश्यक असते. मात्र, मुलांना पाणी पिण्याची सवय नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय लागावी म्हणून शाळेच्या वेळापत्रकात आता तीन वेळा वॉटर बेल वाजवण्याची वेळनिश्चिती करण्यात येणार आहे. तसे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना देण्यात आले आहेत.
वजन, उंची, वयानुसार मुलांनी रोज दीड ते दोन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. मुलांचा दिवसातील पाच ते सात तासांचा कालावधी शाळेत जातो. या कालावधीत शरीराला पाण्याची अनेकदा गरज असूनही अभ्यास, खेळ यामुळे अनेक विद्यार्थी पाणीच पित नाहीत. अनेक लहान मुले सकाळी घरातून नेलेले पाणी पुन्हा घरी घेऊन येतात. आपली मुले शाळेत पाणी पीत नसल्याच्या अनेक तक्रारी पालक नेहमी करत असल्याचे अनेक सर्वेक्षणातूनही समोर आले आहे.शाळेतील अनेक विद्यार्थी घरातून नेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या अनेकदा तशाच घरी आणतात आणि दिवसभरात शाळेत खूप कमी पाणी अनेक विद्यार्थी पीत असल्याचं निदर्शनास आले. तेव्हा शाळेमध्ये पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी शाळेच्या वेळापत्रकातच तीन वेळा वॉटर बेल वाजवण्याची वेळनिश्चिती केली जाणार आहे. सोबतच या उपक्रमाचा अहवाल शालेय शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व शाळांकडून घ्यावा जेणेकरुन या उपक्रमाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही हे कळेल.

या कारणास्तव या वेळांमध्ये शाळांनी मुलांना स्वच्छतागृहे वापरण्याचीही मुभा द्यावी, असे परिपत्रकात नमूद केलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा भरण्याची आणि सुटण्याची सूचना देणारी घंटा आता विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठीही वाजवण्यात येणार आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment