![]() |
नाईट लाईफसाठी ही शहरे आहेत प्रसिद्ध |
मुंबई शहरामध्ये 26 जानेवारीच्या रात्रीपासून ‘नाईट लाईफ’ला राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
नाईट लाईफ म्हणजे? : रात्री 11 नंतर पहाटेपर्यंत हॉटेल्स, पब, बार, सिनेमागृहे, म्युझिक कॉन्सर्टस्, डिस्को डान्स, पार्ट्यांचा आनंद घेण्याला नाईट लाईफ असे म्हणतात.
▪ न्यूयॉर्क : ‘सिटी दॅट नेव्हर स्लीप’ म्हणजेच कधीही न झोपणारे शहर अशी या शहराची ओळख आहे. या शहरातील ‘टाईम्स स्क्वेअर’ हा भाग कायम उजळ असतो. रात्रभर या भागातील बार, पब, म्युझिक शो सुरू असतात.
▪ बँकॉक : नाईट लाईफसाठी थायंलडची राजधानी बँकॉक हे शहरही ओळखले जाते. बार आणि पबमध्ये येथील काही भागातील घरांचे रूपांतर करण्यात आल्यामुळे यातून थायलंडची संस्कृतीही पाहायला मिळते.
▪ ब्राझील : ब्राझीलमधील रिओ डी जेनिरीओ हे शहर देखील नाईट लाईफसाठी ओळखले जाते. जर या ठिकाणी तुम्ही शनिवारी आणि रविवारी गेलात तर चुकूनही एखादा पब रिकामा सापडणार नाही. तसेच येथील समुद्र किनाऱ्यावरही पर्यटकांची गर्दी असते.
अन्य देश : या शहरांसोबतच नाईट लाईफसाठी दक्षिण कोरियातील सेऊल, अमेरिकेतील मायामी, लास वेगास, आर्यलॅंडमधील डबलीन, बोलिव्हियामधील ला पाझ, दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन, जर्मनीतील बर्लिन आणि इतरही शहर प्रसिद्ध आहेत.
दिवसभर काम केल्यानंतर मोठ्या शहरांमध्ये रात्रीच्यावेळी एन्जॉय करण्याची पद्धत रुजु झाली आहे. बऱ्याच ठिकाणी निवासी भाग वगळून अशा नाईट लाईफला परवानगी देण्यात येते.
0 comments:
Post a Comment
Please add comment