![]() |
विठुमाऊलीचा शाही विवाहसोहळा |
आज
पर्यंत अनेक विवाह सोहळे झाले,होतील . पण जर देव देवतेचा विवाह असेल
तर…असाच एक शाही विवाह सोहळा पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुख्मिणीचा
वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विवाह संपन्न झाला तोही शाही पद्धतीने. मंगल
अक्षता,सनई चौघडे आणि उपस्थित व-हाडी मंडळी उपस्थितीत हा विवाह सोहळा पार
पडला. वसंत पंचमी ते रंगपंचमी पर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर
गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे.त्यानुसार देवाला पांढरा शुभ्र पोशाख
परिधान करण्यात आला.
वसंत
पंचमीला श्री विठ्ठल आणि रुख्मिनिचा विवाह झाला होता असा उल्लेख एकनाथ
महाराजांनी लिहलेल्या रुख्मिणी स्वयंवरात केला आहे.हा विवाह सोहळा पूर्वी
उत्पात समाज करीत होते. त्यानंतर आता मंदिर समिती श्री विठ्ठल मंदिरात तर
उत्पात समाज वशिष्ठ आश्रम येथे या दिवशी हा सोहळा करून परंपरा जपत आहे. हा
विवाह सोहळा दिमाखदार करण्यासाठी म्हणून संपूर्ण देऊळ विविध रंगेबिरंगी
फुलांनी सजविले होते.सकाळी श्री विठ्ठल आणि रुख्मिणीला शुभ्र वस्त्र तर
रुख्मिणी मातेस मोत्याचे दागिने,नथ,हिरवा चुडा आणि शुभ्र अलंकाराने सजविले
गेले.
वास्तविक
पाहता शिशिर ॠुतु म्हणजे थंडी संपून वसंत ॠुतु म्हणजे उन्हाळा सुरु होतो.
सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. वसंत ऋतू च्या
आगमनाने सर्व सृष्टी फुलून जाते.सर्वत्र चैतन्याचे वातावरण तयार होते .
आजचा दिवस रती आणि कामदेवाच्या पूजेचा असल्याच मानल जाते.वसंत ऋतूच्या
आगमनाने सर्व सृष्टीमध्ये चैतन्य आल्याचाच हे प्रतिक आहे.या ॠुतु मध्ये
पांढरे वस्त्र परिधान केले तर उन्हाची तीव्रता कमी होते. म्हणजेच विज्ञाना
ची जोड पूर्वी पासून होते.हा विवाह सोहळा झाल्यावर सांयकाळी दोन्ही
मूर्तीची नगरामधून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली.असे असले तरी वारकरी
सांप्रदायात अनेक परंपरा आजही जपल्या जात आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment