निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषी  पवन गुप्ताची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषी झालेल्या चार दोषींपैकी पवन गुप्ता याच्यावतीने अल्पवयीन असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पवन गुप्ताकडून दावा करण्यात आला होता की, 16 डिसेंबर 2012 रोजी तो अल्पवयीन होता. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही. न्यायाधीश आर भानुमती यांच्या अध्यक्षतेखाली पीठाने ही याचिका फेटाळून लावत, हीच बाब कितीवेळा पुढे आणणार आहात? अल्पवयीन असल्याचं ट्रायल कोर्टात का सांगितलं नाही असे प्रश्न विचारले.
दोषी पवन गुप्ताच्यावतीने यासंदर्भात दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court)  फेटाळली गेली होती. पवन गुप्ताने याचिकेत दावा केला आहे की, 16 डिसेंबर 2012 रोजी तो अल्पवयीन होता, म्हणून त्याला फाशी होऊ शकत नाही. पवन म्हणाला की, दिल्ली उच्च न्यायालयाने या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने पवनचा वकील ए.पी. सिंगला पवन अल्पवयीन असल्याची विनंती फेटाळून लावत 25,000 रुपये दंड ठोठावला होता. दोषी पवनची याचिका सुप्रीम कोर्टाकडूनही फेटाळली गेली तर त्याला निवारक याचिका आणि दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठवण्याचा पर्याय असणार आहे.
विशेष म्हणजे निर्भया प्रकरणातील आणखी एक आरोपी मुकेश सिंग यांची दया याचिका राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी यापूर्वीच फेटाळली आहे. खरंतर, क्यूरेटिव पिटिशन फेटाळल्यानंतर मुकेशने राष्ट्रपतींकडे दया दाखल केली. आता त्याच्याकडे कोणताही पर्याय उरला नाही.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment