‘महाराष्ट्र बंद’चे राज्यभरात पडसाद

‘महाराष्ट्र बंद’चे राज्यभरात पडसाद
CAA आणि NRC कायद्याविरोधात आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा बंद पुकारला आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली.नाशिक मध्ये महाराष्ट्र बंदला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत आहे.
महाराष्ट्र बंदला राज्यातील 25 ते 30 संघटना सहभागी होतील असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही प्रकार घडू नये म्हणून राज्यभरात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अमरावती-

CAA व NRC च्या विरोधात  राज्यभर वंचित बहुजन आघाडीनं पुकारलेल्या बंदला अमरावतीत हिंसक वळण लागलं.  शहरात वंचितच्या कार्यकर्त्यांनी  दुकानांवर दगडफेक करण्यात आली. त्यांनातर हिंसक झालेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला तसंच  त्यांना अटक केली.
NRC आणि NRC कायद्याविरोधात देशभरात निषेध व्यक्त होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दंगे झाले आहेत. हा कायदा सरकारने लागू केला आहे, पण यामागे दडपशाही आहे. एकीकडे दडपशाही चालू असताना देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्र बंदची हाक देत आहोत असं सांगत प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

नागपूर-

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंद ला नागपुरात अल्प प्रतिसाद असून , कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत  घोषणाबाजी करत प्रतिष्ठान बंद ठेवण्याची केली विनंती नागरिकांना बंद  मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले बंद ला मात्र विशेष प्रतिसाद मिळाला नाही ,सकाळ पासूनच नागपुरातील बाजारपेठ उघड्या होत्या आणि जनजीवन सुरळीत सुरू होत, बंद ला प्रतिसाद मिळाला नसल्याचं कबूल करत बंदच्या निमित्ताने जनजागृती करत असल्याच वंचित आघाडी चे शहराध्यक्ष रवी शेंडे यांनी सांगितलं

नांदेड-

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या नांदेड बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. वर्कशॉप कार्नरहून निघालेला मोर्चा श्रीनगर,आयटीआय चौक,शिवाजीनगर,वजिराबाद मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात हजारो आंदोलक सहभागी झाले होते.
दरम्यान तेथील उद्यान परिसरातल्या नंदी डेलीनिडस वर जमावाच्या एका टोळक्याकडुन दगडफेक करण्यात आली. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. शहरातील अनेक भागांमध्ये बंद करण्याबाबत युवकांनी पुढाकार घेतला यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

कोल्हापूर-

वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला कोल्हापुरकरांनी प्रतिसाद दिला नाही.शहरातील सगळे व्यवहार आज सुरळीत होते.वंचित आघाडीने बिंदू चौकात एकत्र येत सरकार विरोधात निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
सकाळपासून मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद होता.मात्र चेंबूरच्या स्वस्तिक पार्क जवळ बीएसटी बसवर दगड फेक करून बसच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच सायन-ट्रॉम्बे रोडवर वंचित कडून रास्ता रोको करण्यात आला. सोलापूरमध्ये ही बंदला हिंसक वळण मिळाले. सोलापूरमध्ये ही गाड्यांची फोडण्यात आली. तर औरंगाबादमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद आहे.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment