![]() |
पोलिस बंदोबस्तात मिळणार शिवभोजन |
शिवभोजन केंद्रांवर गर्दी होऊन गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेत शिवभोजन केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवावा, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहे.
शिवभोजन योजना 26 जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर लागू होणार आहे. राज्यातील गरीब नागरिकांसाठी ही योजना असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिवभोजन थाळीचा कोटा ठरवून दिला असल्याने जो प्रथम येईल, त्यालाच लाभ मिळेल, असे सध्याचे स्वरूप आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रत्येक केंद्रासाठी पोलिस कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहे.
वेळ : भोजनाची वेळ दुपारी 12 ते 2 आहे परंतु त्याच्या आधीच जर निर्धारित कोटा संपला तर लाभार्थींना वंचित राहावं लागणार आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment