![]() |
क्रीडा समितीमधून सचिन तेंडुलकर बाहेर |
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि बुद्धिबळाचा बादशाह विश्वनाथन आनंद यांना केंद्रातील मोदी सरकारने खेळाशी संबंधित समितीमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मोदी सरकारने दोन्ही दिग्गजांना डिसेंबर 2015 मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय क्रीडा परिषदेतून काढलं आहे. देशात खेळाच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांवर सल्ला देण्यासाठी केंद्र सरकारने या समिती स्थापन केली होती.
नवे सदस्य म्हणून क्रिकेटर हरभजन सिंह आणि के. श्रीकांत यांचा समावेश करण्यात आला आहे. तत्कालीन क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी डिसेंबर 2015 मध्ये याची स्थापना केली होती. डिसेंबर 2015 पासून मे 2019 पर्यंत समितीच्या पहिल्या कार्यकाळात सचिन तेंडुलकरचा राज्यसभा खासदार आणि विश्वनाथन आनंदचा खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता.
0 comments:
Post a Comment
Please add comment