![]() |
सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'चं पोस्टर रिलीज |
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा आगामी चित्रपट 'शेरशाह'चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. आज या चित्रपटाचे तीन पोस्टर्स रिलीज करण्यात आले असून त्यामध्ये या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्रा दिसत आहे. तिनही पोस्टर्समध्ये सिद्धार्थ मल्होत्रा भारतीय सैन्यदलाच्या गणवेशात दिसत आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकरणाताना दिसणार आहे. दरम्यान, कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 1999 मध्ये कारगिल युद्धा दरम्यान भारतीय क्षेत्राचं संरक्षण केलं होतं. त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला होता. दरम्यान, कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 1999मध्ये कारगिल युद्धादरम्यान दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना 'शेरशाह' असं म्हटलं जातं.
0 comments:
Post a Comment
Please add comment