![]() |
आता मिशन 'राममंदिर'-कंगना रणौत |
अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिचा आगामी सिनेमा ‘पंगा’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तिचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण या सिनेमानंतर कंगनाकडे खूप मोठा प्रोजेक्ट आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनानं याचा खुलासा केला. कंगना या मुलाखतीत जयललिता बायोपिक नंतर तिच्या पुढच्या मिशन बद्दल सांगताना आपलं पुढचं मिशन राममंदिर असल्याचा मोठा खुलासा केला.
कंगना ‘पंगा’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी बिहारला पोहोचली होती. यावेळी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगानाला तिच्या नव्या प्रॉडक्शन हाउसचं नाव आणि तिच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या सिनेमाचं नाव विचारण्यात आलं होतं. याचं उत्तर देताना कंगना म्हणाली. माझ्या प्रॉडक्शन हाउसचं नाव मी माझा सिनेमा मणिकर्णिकाच्या नावावरुन मणिकर्णिका असं ठेवलं आहे आणि आम्ही राम मंदिरावर आधारित अयोध्या नावाच्या सिनेमाची निर्मिती करत आहोत.
0 comments:
Post a Comment
Please add comment