'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात राज्यातील 104 विद्यार्थी आणि 13 शिक्षक सहभागी

'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात राज्यातील 104 विद्यार्थी आणि 13 शिक्षक सहभागी

विद्यार्थ्यांना येणारा परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा 2020’ या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 104 विद्यार्थी आणि 13 शिक्षक सहभागी झाले आहेत. नागपूर, अहमदनगर, नागपूर, ठाणे, बीड, रायगड, वर्धा, हिंगना, रायगड, पालघर, उस्मानाबाद, अकोला, चंद्रपूर, सोलापूर, अमरावती, पुणे, मुंबई अशा विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निवड या कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे. औंध मिलिटरी कॅम्प या केंद्रीय विद्यालयात इयत्ता नववीत शिकणाऱ्या आदर्श नवलगुंड हा 'परीक्षा पे चर्चा,' या कार्यक्रमात पंतप्रधानासोबत संवाद साधणार आहे. या विद्यार्थ्यांमध्ये नांदेडच्या यशवंत विद्यालयाची ऐश्वर्या मुंडकर, रायगडचा गोविंदराजू, हिंगण्याचा यश कुमार, उस्मानाबाद येथील पूनम चव्हाण, मिश्रीलाल पहाडे स्कूलचा जय जगदीश पारीख , सेंट लॉरेन्स स्कूलचा श्रेयस मयूर पांडव, पोदार स्कूल नचिकेत पाटील, बजाजनगर येथील ऑर्चिड स्कूलचा जयेश राजेंद्र खोमणे, नवोदय विद्यालयाचा अर्जुन थोरात तर मिश्रीलाल पहाडे स्कूलचे शिक्षक अनंत बनगर यामध्ये सहभागी झाले आहेत.

वर्धा येथील चक्रधर काळे देखील या चर्चेमध्ये सहभागी झाला आहे. चक्रधर अल्फोन्सा सिनियर सेकंडरी स्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. चक्रधरला वाचन, वृत्तपत्र वाचनाची आवड आहे. त्याला भजन, किर्तनासोबत अध्यात्माची देखील आवड आहे. संधी मिळाल्यास पंतप्रधान मोदी यांना शिक्षण आणि अध्यात्माशी संबंधित प्रश्न विचारणार असल्याचं चक्रधर काळे सांगितले आहे. परीक्षा पे चर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन परिक्षेत चक्रधर सहभाग नोंदवला होता. चक्रधर या परीक्षेत उत्तीर्ण झाला. देशातील दोन हजार विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाअंतर्गत ते परीक्षा आणि विद्यार्थ्यांवर येणार ताण या विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment