दावोसमध्ये इम्रान खान आणि ट्रम्प यांची भेट,काश्मीरवर भारत-पाकिस्तानची मदत करण्यासाठी तयार.
![]() |
काश्मीरवर भारत-पाकिस्तानची मदत करण्यासाठी तयार-ट्रम्प |
बैठकीमध्ये राष्ट्रपती ट्रम्प म्हणाले की, इम्रान खान त्यांचे चांगले मित्र आहेत. दोन्ही नेत्यांनी या बैठकीआधीच ट्रम्प यांनी सांगितले होते की काश्मीर मुद्दा आणि अफगान शांती यावर या बैठकीमध्ये व्यापक चर्चा होणार आहे. दावोसच्या या सम्मेलनात अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान यांच्या बैठकीवर संपूर्ण जगाचे लक्ष होते.डब्लूईएफच्या झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांनी अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधांना वाढवण्यासाठी सहमती दाखवली आहे. अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी परस्पर हित, प्रादेशिक सुरक्षा, काश्मीर आणि अफगाणिस्तान शांतता प्रक्रिया यावरही भाष्य केले. या बैठकीत इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तान सुरुवातीपासूनच आपल्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करणारा देश आहे. त्यामुळे संपूर्ण प्रदेशात आपली महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी ते नेहमीच तयार असतील.
0 comments:
Post a Comment
Please add comment