![]() |
भ्रष्ट देशांच्या यादीत भारताचं रँकिंग घसरलं. |
भ्रष्ट देशांच्या यादीत भारताचं रॅकिंग घसरलं आहे. 2018मध्ये 78व्या क्रमांकावर असलेला भारत आता 80व्या क्रमांकावर पोहोचला आहे. India’s ranking in the Corruption Perceptions Index (CPI-2019) ने 180 देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पाकिस्तान 120 क्रमांकावर असून डेनमार्क सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. ट्रान्स्परेंसी इंटरनॅशनलने दावोसमधील विश्व आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीदरम्यान ही यादी जाहीर केली आहे.
2017च्या यादीत भारत 81व्या क्रमांकावर असून त्याचे गुण 40 अंकावर होते. तर याआधी 2016मध्ये भारत या इंडेक्समध्ये 79व्या क्रमांकावर होता. भारतासोबत चीन, घाना, बेनिन आणि मोरक्को हेदेखील 80व्या क्रमांकावर होते. या यादीमध्ये सार्वनजनिक क्षेत्रांतील भ्रष्टाचारांच्या प्रकरणांमध्ये 180 देशांचा समावेश करण्यात आला आहे. फिनलँड, स्वीडन, स्वित्झर्लंड, नॉर्वे, नीदरलँड, जर्मनी आणि लक्जमबर्ग या यादीमध्ये पहिल्या 10 क्रमांकांवर आहेत.
ग्लोबल करप्शन परसेप्शन इंडेक्सनुसार, दोन तृतियांश देशांचे गुण 50 पेक्षा कमी आहेत आणि सरासरी गुण 43 आहेत. 2012पासून आतापर्यंत केवळ 22 देशांमधील भ्रष्टाचार कमी झाला आहे. यामध्ये एस्टोनिया, ग्रीस आणि गुयाना या देशांचा समावेश आहे. 21 देशांचे गुण कमी झाले आहेत. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि निकारागुआ या देशांचा समावेश आहे. जी-7 देशांच्या चार देशांचे गुण कमी झाले आहेत. यामध्ये कॅनडा, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. जर्मनी आणि जपान या देशांच्या गुणांमध्ये काहीच सुधारणा झालेली नाही. इटलीचे गुण मात्र वाढले आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment