![]() |
भारतीय संघाचा खेळाडू करुण नायरने आपली लग्नगाठ बांधली. |
भारतीय क्रिकेटर करुण नायरने आपली गर्लफ्रेंड शनाया टंकरीवाला सोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. करुण आणि शनायाचा लग्नसोहळा उदयपूरमध्ये पार पडला. लग्नाचे काही फोटो शेअर करत या दोघांनी स्वतः आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली. करुणने आपल्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. त्यानंतर चाहत्यांनी त्याच्या फोटोंवर लाईक्ससोबतच शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, करुण नायर आणि शनाया टंकरीवाला यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये साखरपुडा केला होता. दोघेही एकमेकांना बरेच दिवसांपासून जेट करत होते. वर्षाभरापूर्वी करुणने शनायाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. दोघांनी आपल्या रिलेशनशिपबाबत आपल्या कुटुंबियांनाही सांगितलं होतं. तसेच त्यांच्या लग्नासोहळ्यासाठी काही नातेवाईक आणि त्यांचे मित्रमंडळी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment
Please add comment