रात्री फोटोग्राफीसाठी 'या' फोनमधील कॅमेरा बेस्ट

रात्री फोटोग्राफीसाठी 'या' फोनमधील कॅमेरा बेस्ट
जर रात्रीच्या अंधारात चांगला फोटो काढायचा आहे तर मग बाजारात सध्या हे स्मार्टफोन्स चांगले आहेत, पाहुयात कोणकोणते आहेत ते स्मार्टफोन्स. स्मार्टफोनचा सध्या जमाना आहे. जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर तुम्ही दिवस चांगले फोटो काढण्यासोबतच रात्रीच्या अंधारातही चांगले फोटो काढू शकता. चांगले फोटो काढण्यासाठी बाजारात काही चांगले स्मार्टफोन्स आहेत.

  • Nokia 7.2

                                                                       Nokia 7.2

बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी हा स्मार्टफोन सर्वोत्तम आहे. या फोनमध्ये पाठीमागे क्वॉड पिक्सल टेक्नोलॉजी आणि ZEISS ऑप्टिक्ससह ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. तसेच फोनमध्ये ८ आणि ५ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहे. सेल्फीसाठी फ्रंटला २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

  • Huawei P30 Pro

                                                      Huawei P30 Pro

पी३० प्रो फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. फोनमध्ये टाइम ऑफ फ्लाइट ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशनसह पेरिस्कोप दिला आहे. तसेच ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप 40MP+20MP+8MP सेन्सर दिला आहे.

  • Samsung Galaxy Note 10+

                                                                Samsung Galaxy Note 10+

गॅलेक्सी नोट प्लसच्या व्हर्जनमध्ये चार लेन्स आहेत. यात एक पिक्चरचा डेप्थ देतो. कॅमेऱ्याची क्वॉलिट जबरदस्त आहे. अंधारात चांगला फोटो काढता येऊ शकतो. फोनमध्ये F2.2 सह १०.० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच 12MP+12MP+16MP सेन्सरचा सेटअप दिला आहे.

  • Samsung Galaxy S10

                                                                         Samsung Galaxy S10

सॅमसंगच्या या फोनच्या रियरमध्ये तीन कॅमेरे दिले आहेत. फ्रंटमध्ये १० मेगापिक्सलचा सेल्फीसाठी दिला आहे. बॅकमध्ये १२ मेगापिक्सलचा आणि १६ मेगापिक्सलचा कॅमेरे दिले आहेत. कमी प्रकाशात चांगला फोटो क्लिक करता येतो.

  • Honor 20 Pro

                                                                             Honor 20 Pro

या फोनमध्ये रियरमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सह १६ मेगापिक्सलचा सुपर वाइड अँगल कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा ३डी पोर्ट्रेट लाइटनिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

  • Huawei Mate 20 Pro

                                                                  Huawei Mate 20 Pro

यात ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ४० मेगापिक्सलचा वाइड-अँगल लेन्स, अपर्चर एफ२.२ सह २० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह ८ मेगापिक्सलचा टेलिफोट लेन्सर दिला आहे. हा कॅमेरा ऑटोफोकस करतो. फ्रंट कॅमेरा २४ मेगापिक्सलचा आणि ३डी डेप्थ सेंसिग कॅमेरा सपोर्ट करतो.

  • Google Pixel 3

                                                                             Google Pixel 3

१२.२ मेगापिक्सलचा रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. याचा पिक्सल १.४ यूएम आणि अपर्चर फ१.८ आहे. फ्रंट पॅनेलवर एक ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर आहे. याचा अपर्चर f/2.2 आणि फिल्ड ऑफ व्ह्यू ९७ डिग्री आहे. तर दुसरा ८ मेगापिक्सलचा असून अपर्चर f/1.8 आणि फिल्ड ऑफ व्ह्यू ७५ डिग्री आहे.

  • Xiaomi Mi 9

                                                                                   Xiaomi Mi 9

या फोनमध्ये रियरमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअफ दिला आहे. यात ४९ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर १६ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात सफायर ग्लास फिनिशसह येते. कॅमेऱ्यातील स्क्रॅचला वाचवण्याचे काम करतो.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment