आज भारतीय सेना दिवस. ! जय हिंद !

आज, भारतीय सेना आपला 71 वा सैन्य दिन साजरा करीत आहे



१५ जानेवारी. भारतीय सैन्य दिवस. यंदाचे हे ७२वे वर्ष. भारतीय सैन्याची स्थापना १७७६ ला ईस्ट इंडिया कंपनीने कोलकात्यात केली. भारतीय सैन्याच्या ५३ छावण्या आणि ९ सैन्य तळ आहेत.

भारतीय भूदलाची सुरूवात ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याच्या रुपात झाली होती. त्यानंतर ते ब्रिटिश भारतीय सैन्य झाले व नंतर त्याला भारतीय भूदल सैन्य, असे नाव देण्यात आले.

गेल्या वर्षी सैन्य दिनाच्या निमित्ताने परेडचे नेतृत्व लेफ्टिनेंट भावना कस्तूरी या महिला अधिकाऱ्यांनी केले. मात्र यंदा पहिल्यांदाच सैन्य प्रमुखांऐवजी सीडीएस जनरल बिपिन रावत यांना सलामी देण्यात आली.


१९४९ ला आजच्याच दिवशी भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल फ्रांसिस बुचर यांच्या स्थानावर तत्कालिन लेफ्टिनेंट जनरल केएम करियप्पा हे भारतीय सैन्याचे कमांडर इन चीफ झाले होते.

केएम करियप्पा हे पहिले, असे अधिकारी आहेत कि, ज्यांना फील्ड मार्शल ही उपाधी देण्यात आली होती. त्यांना ती २८ एप्रिल १९८६ ला दिली होती. त्यांनी १९४७ मध्ये भारत-पाक युद्धामध्ये भारतीय सैन्याचे नेतृत्व केले होते.

दुसऱ्या विश्वयुद्धात बर्मामध्ये जापानला पराभूत करण्यासाठी त्यांना ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने सन्मानित करण्यात आले होते. १९९३ मध्ये ९४ वर्षांचे असताना त्यांचे निधन झाले.






About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment