सरकारचा मोठा निर्णय, चीनमधून 250 भारतीयांची करणार सुटका

सरकारचा मोठा निर्णय, चीनमधून 250 भारतीयांची  करणार सुटका


झपाटयाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूंचे केंद्र असलेल्या चीनच्या वुहान शहरातून 250 ते 300 भारतीयांना हलविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. चीनसह इतर अनेक देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी तातडीची बैठक बोलावली होती.
'कोरोना'या व्हायरस चीनमध्ये झपाट्याने पसरत असून जगभर त्याबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. जगातल्या अनेक शहरांमध्ये आता 'कोरोना'ने पीडीत असलेल्या व्यक्तिंची ओळख पटविण्यात आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चीनमधल्या वुहान शहरात सर्वात जास्त रुग्ण असून तिथेच हा व्हायरस सापडला होता. त्यामुळे चीन सरकारने हे शहर सार्वजनिक वाहतुकीपासून बंद केलं आहे. शहराचे सर्व रस्ते येण्या-जाण्यासाठी बंद केले असून नागरिकांना या शहरात जाण्यापासून आणि शहरात प्रवेश करण्यापासून नागरिकांना मज्जाव करण्यात आलाय. या शहरात 250 ते 300 भारतीय असून त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्याची तयारी केंद्र सरकारने केलीय.
बैठकीत परिस्थिती हाताळण्याबाबत भारताच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या भारतीयांच्या सुटकेसाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्याची परवानगी केंद्र सरकार चीनकडे मागणार आहे. त्यासाठीची सगळी तयारी करणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे. चीनमध्ये या व्हायरसमुळे 81 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय तर 3 हजार जणांना त्याची लागण झालीय.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment