![]() |
2 कोटींचा गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक |
भारताची विख्यात गुप्तचर संस्था असलेल्या RAWचा अधिकारी असल्याची बतावणी करत फसविणाऱ्या एका भामट्यला औरंगाबाद पोलिसांनी जेरबंद केलंय. या भामट्याने जी माहिती दिली त्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. कुणाला तो नासात असल्याचं, पंतप्रधान कार्यालयात असंल्याचं तो सांगत असे आणि आर्थिक फसवणूक तो करत होता असंही उघड झालंय. देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या रॉ चा अधिकारी असल्याची थाप मारून औरंगाबादेत अनेकांना कोट्यावधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या नाशिकच्या एका भामट्याच्या आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
अभिजीत पानसरे असे तोतया रॉ च्या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्याकडून पोलिसांनी आयपीएस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र, तसेच अंतराळ संस्था नासा व पंतप्रधान कार्यालयाचे बनावट कागदपत्रे व कलर प्रिंटर असे अनेक साहित्य पोलिसांनी हस्तगत केली आहे. अशी माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.
अभिजीत पानसरे हा आपण आयपीएस अधिकारी असून देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या रॉ साठी काम करीत असल्याची थाप मारत होता. उच्चशिक्षीत असलेला पानसरे हा हाय-फाय इंग्रजीत बोलून समोरच्या व्यक्तीवर छाप पाडत होता.
औरंगाबादमधील रहिवासी शरद किसनराव गवळी यांना पानसरे याने आपण रॉ चे अधिकारी असून नासाच्या वतीने आपल्याला न्युक्लियर रियाक्टर तयार करण्याचे कंत्राट मिळाले आहे असे सांगितले. त्यासाठी पानसरे याने गवळी यांना नासाची बनावट कागदपत्रे, बनावट धनादेश दाखवून ते खरी असल्याचे भासविले होते.
आणि दोन कोटींची फसवणूक केली होती. कोठडीत असताना पानसरे कडून पोलिसांनी पंतप्रधान कार्यालयाचे बनावट पत्र, बनावट चेक, नासा या अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थेचे बनवतात पत्र असे अनेक महत्वाचे कागदपत्रे व हे कागदपत्रे तयार करण्यासाठी वापरात असलेला प्रिंटर पोलिसांनी जप्त केला आहे.अशी माहिती आज पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment