2021 मध्ये अमेरिकेतील टेक कंपनी अॅपल पूर्णपणे वायरलेस आयफोन लॉन्च
करण्याच्या तयारीत आहे, असा दावा टेक अॅनालिस्ट मिंग-ची क्योने आपल्या
रिपोर्टमध्ये केला आहे.
आतापर्यंत अॅपलमध्ये चार्जिंग पोर्ट म्हणून अॅपलमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळत आले आहे.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, आता कंपनी संपूर्णपणे वायरलेस फोनच्या टेक्नॉलॉजीकडे वळत आहे.
जाणून घ्या रिपोर्ट
अॅपल
हायस्ट एंड आणि हाय एंड मॉडलमध्ये अंतर ठेवणार आहे. ज्यामुळे ग्लोबल
मार्केटमध्ये त्यांच्या सर्वात वरच्या मॉडेलची विक्री जास्त होईल.
आशा
केली जात आहे की, 2021 मध्ये आयफोनच्या टॉप-एंड मॉडल्समध्ये लाइटनिंग
पोर्ट नसेल आणि या संपूर्णपणे वायरलेस अनुभव मिळेल. 2020 मध्ये अॅपल एकूण 5
आयफोन बाजारात आणू शकतो.
पुढील वर्षी लॉन्च होणाऱ्या मॉडल्समध्ये
एक 6.7 इंच हाय-एंड आयफोन, दोन 6.1 इंच आयफोन आणि एक एंट्री लेवल 5.4 इंच
आयफोन असेल. त्या सर्व फोनमध्ये 6 गीगाहर्ट्ज आणि 5जी एमएम वेव सपोर्ट
मिळेल.
0 comments:
Post a Comment
Please add comment