भाजीपाला कीड नियंत्रण व्यवस्थापन
टोमॅटो : नागअळी - (फवारणी प्रति लिटर पाणी)
-
नागअळीचा प्रादुर्भाव रोपवाटिकेपासूनच चालू होतो, त्यामुळे
प्रादुर्भावग्रस्त रोपांची पाने पुनर्लागवडीच्या वेळी अथवा लागवडीनंतर एक
आठवड्याच्या आत काढून नष्ट करावीत.
- लागवडीच्या वेळी व नंतर 25 दिवसांनी 250 किलो प्रति हेक्टरी निंबोळी पेंड जमिनीतून द्यावी.
- लागवडीनंतर 15-20 दिवसांनी निंबोळी अर्क (5 टक्के) किंवा कडूनिंबावर आधारित कीटकनाशक ॲझाडिरेक्टीन (50,000 पीपीएम) एक मि.लि.
रासायनिक कीडनाशक- (फवारणी प्रति लिटर पाणी)
- ट्रायझोफॉस (40 टक्के) 1 मिलि अधिक निंबोळी तेल 1 मिली.
- डेल्टामेथ्रीन (2.8 टक्के) 1 मिलि किंवा
- ट्रायझोफॉस (40 टक्के) 2 मिलि
पांढरी माशी नियंत्रण
- रोपवाटिकेभोवती नायलॉनची जाळी बसवावी.
-
रोप 15 दिवसांची असताना, इमिडाक्लोप्रिड (20 टक्के) 0.3 मिलि किंवा
थायामेथोक्झाम (25 टक्के) 0.3 ग्रॅम प्रति लिटर पाणीप्रमाणे फवारणी करावी.
- पुनर्लागवडीपूर्वी रोपांना वरीलपैकी एका कीटकनाशकाची आळवणी करावी. ट्रेमध्ये रोपे असतील, तर लागवडीच्या एक दिवस अगोदर आळवणी करावी.
-
पुनर्लागवडीनंतर गरजेनुसार इमिडाक्लोप्रिड (25 टक्के) 0.3 ग्रॅम प्रति
लिटर पाण्यात मिसळून फवारावे; परंतु फळे लागल्यानंतर फवारणी टाळावी.
-
पिवळ्या चिकट सापळ्याचा वापर करावा. त्यावर माश्या चिकटलेल्या आढळल्यास,
डायमिथोएट (30 टक्के) 1 मिलि किंवा निंबोळी तेल 1 मिलि फवारणी करावी.
वांगी :
1) शेंडा व फळे पोखरणारी अळी
- रोपवाटिकेभोवती नायलॉनची जाळी बसवावी.
- प्रादुर्भावग्रस्त शेंडे फुलोऱ्यापूर्वी व फुलोरा अवस्थेत वेळोवेळी काढून नष्ट करावीत.
- फळे काढणीनंतर प्रत्येक वेळी प्रादुर्भावग्रस्त फळे, फुले व कळ्या काढून टाकाल्यात.
- पिकांच्या सभोवती मक्यांची ओळ लावावी.
- हेक्टरी 250 किलो निंबोळी पेंड शेतात वापरावी. शक्य असल्यास 30-45 दिवसांच्या अंतराने दोन वेळा परत द्यावी.
- सायपरमेथ्रीन 0.75 मिलि प्रति लिटर पाणी
2) तुडतुडे - (प्रति लिटर पाणी)
- डायमिथोएट (30 टक्के) 1 मिलि किंवा
- इमिडाक्लोप्रिड (20 टक्के) 0.3 मिलि पाणी
0 comments:
Post a Comment
Please add comment