राज्यातल्या उद्धव ठाकरे सरकारला एक महिना पूर्ण होत असतानाच गेले काही दिवस अमृता फडणवीस आणि शिवसेने दरम्यान जोरदार ट्विटर वॉर सुरू आहे. अमृता फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला होता. त्यानंतर शिवसेनेनेही अमृता फडणवीसांवर बोचऱ्या शब्दात टीका केली होती. त्यावरून सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगलीय. आता युवासेनेचे प्रमुख आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अमृता फडणवीसांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केलीय. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतलं आरोप-प्रत्यारोपांचं युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते आशीष शेलार यांनीही अमृता फडणवीसांवरच्या टीकेवरून थेट उद्धव ठाकरेंना सवाल केला होता. आदित्य ठाकरे म्हणाले, ज्या लोकांनी दिलेला शब्द पाळला नाही. जे लोक सत्तेपासून दूर गेलेत त्यांच्या मनातलं दु:ख मला कळतं. आमच्यावर जनतेने जो विश्वास दाखवलाय तो सार्थ करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. ट्रोल करणाऱ्यांवर शिवसैनिकांनी लक्ष देऊ नये. त्यांना काहीही करू द्या. काही ठिकाणी इंटरनेट बंद नाहीये. त्यामुळे त्यांना खुशाल ट्वीट करू द्या असं मतही त्यांनी व्यक्त केलंय.
वाद चिघळला, Axis Bankला फटका
शिवसेना विरूद्ध अमृता फडणवीस वाद दिवसेंदिवस टोकाला पोहोचत चालला आहे. अमृता फडणवीस यांच्या टीकेनंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस दलाची खाती एक्सिस बँकेतून वळवल्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे एक्सिस बँकेत खाती आहे. आता या बँकेतील खाती सरकारी बँकेमध्ये ताबडतोब वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी आज तातडीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे.
एलबीटी, टॅक्स खाती, कर्मचाऱ्यांचे पगार खाती सध्या एक्सिस बँक मध्ये आहेत. त्यांना सरकारी बँकमध्ये वळवण्यात येणार आहे.काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी ट्विट करून ठाकरे कुटुंबीयांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर शिवसेनेनं एकापाठोपाठ धक्कातंत्र हाती घेतले आहे.
याआधीही ठाकरे सरकारने आणखी एक असाच निर्णय घेतला होता. या निर्णयाचा दणका आता Axis Bankला बसणार आहे. या बँकेत तब्बल 2 लाख पोलिसांचे सॅलरी अकाउंट्स (Salary Accounts) आहेत. ती सर्व खाती आता सरकारी मालकीच्या SBIमध्ये वर्ग करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती पुढे आली.
खासदार संभाजीराजे छत्रपती 'खाबूगिरी आणि बाबूगिरी'ला कंटाळले, राजीनामा देणार?
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होणार असल्याचं सांगितलं जातंय.विशेष म्हणजे, अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) या बँकेत त्यावेळी उच्च पदावर होत्या. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पोलिसांची वेतन खाती Axis Bankमध्ये वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून त्यावेळी वादही झाला होता
0 comments:
Post a Comment
Please add comment