उसात लागण,बाळभरणी, पक्की भरणी नंतर जर एखादी कृती जर आपण करत असो तर ती आहे पाला काढणे. ऊस जोमदार वाढीचा अवस्थेला आला की आपण सर्व शेतकरी पाला काढणीचा मागं लागतो. पाला काढण्या मागे वेगवेगळी कारणं आहेत जसे की पाला काढला की उसाची जाडी वाढते,पाला काढला की ऊस टणक होतो इत्यादी.पण खरच पाला काढल्यामुळे उसाची जाडी किंवा टणकपणा वाढतो का?
काही शेतकरी उसाने कांडी धरली की लगेच त्याचा पाला काढायला
सुरुवात करतात. चांगला हिरवा पाला काढून घेतात. तर काही शेतकरी वाट बघतात.
ऊस जोमदार वाढीचा अवस्थेत आला की पाला काढायला सुरुवात करतात. *पाला
काढल्यामुळे जर ऊस टणक होत असेल किंवा त्याची जाडी वाढत असेल तर हा एक
गैरसमज आहे* . त्या मागचे शास्त्रीय कारण द्यायचे झाल्यास, उसाचा बाबतीत
ज्या अवयवाला आर्थिक किंमत आहे किंवा ज्याचा आपल्याला आर्थिक मोबदला मिळतो
ते आहे त्याचे खोड. जर ह्या खोडाची जाडी चांगली असेल तर त्या उसाचे वजन
आपल्याला मिळेल. आपल्या उसाचे वजन त्यावेळी वाढते ज्या वेळी त्या मध्ये
साखरेचे प्रमाण वाढते. साखर ही पानात तयार होते. पानात तयार होऊन खोडात
साठवली जाते. खोडात साखर तेव्हाच साठणार ज्या वेळी कांडी आणि पानामध्ये थेट
संपर्क असेल(पाला उसाचा खोडावर टिकून असेल). आपण ज्या वेळी पाला काढतो
त्यावेळी गर्द हिरवी पाने तर काढतोच शिवाय काही पानं जे अर्धी हिरवी
आहेत(ज्याचे कडे वाळलेत) अशीही पानं आपण काढून टाकतो. त्याचा विपरीत परिणाम
उसामध्ये साखर तयार होण्यावर होतो. जी अर्धी हिरवी पानं आहेत तीही काढू
नये त्या मागचे मुख्य कारण असे की पान जर थोडं जरी हिरवं असेल तर त्या
मध्ये साखर तयार करण्याची क्षमता आहे. आपण ही क्षमता गरज नसताना काढून
घेतो. जर आपण ह्याचे अर्थिक गणित केले जर समजा आशा अर्ध्या वाळलेल्या पान
जर आपण काढली नाहीत आणि अशी पाने मृत होण्या आधी जर १ ग्राम जरी साखर साठवू
शकले तर १० कांडीचे १०ग्राम होतात. एका बेटाला १०फुटवे धरले तर १००ग्राम.
बेटा मागे आपल्याला १००ग्राम वाढीव वजन मिळू शकते आणि एकरी ६५०किलो जास्त
ऊस भेटतो.
दुसरा समज असा आहे
की हवा खेळती राहते त्यामुळे वजन वाढते. आम्ही मागचे काही वर्षे बेणे मळा
करतो. बेनेमळ्यासाठी उसाचा पाला काढणे वर्ज्य असते. त्यामुळे आम्हाला असा
अनुभव आला की पाला न काढताही आपल्याला जाडी चांगली मिळते. पाला न
काढल्यामुळे हवा खेळती राहत नाही तरीही ऊसहा टणक आहेच. आपण ज्या वाणाची
निवड करतो ते वाण जसे की को ८६०३२,फुले ०२६५,६७१,४१९,८००५,१०००१,८०२१, ८०११
किंवा इतर कोणतेही. हे सर्व वाण हे संकरीत आहेत. पूर्वी जे देशी वाण होते
जसे की पुंडया हे वाण खाण्यासाठी योग्य होते पण त्या मध्ये जास्त उत्पादन
देण्याची क्षमता नव्हती. पुंड्या सारखे वाण हे टणक नव्हते. दाताने खाण्यास
सोयीस्कर असे वाण होते. पण नवीन संकरीत वाण हे नैसर्गिकरीत्या टणक आहेत.
त्यामूळे टणकपणा हा विचारात घेण्यासारखा मुद्दा वाटत नाही.
पाला काडण्यामागचे मुख्य कारण असे आहे की शेतकऱ्याला
त्याचा घरची जनावरं जगवायची असतात. त्यांचा चाऱ्याचा प्रश्न ह्या पाल्यातून
निघतो. पाला काढून संपूर्ण क्षेत्राचे उत्पादन कमी करण्यापेक्षा स्वतंत्र
थोड्या क्षेत्रावर जनावरांचा चाऱ्याची लागण करावी. जेणेकरून जनावरांना पोषक
असा चारा मिळेल शिवाय उसाची वाढ ही चांगली होईल.
0 comments:
Post a Comment
Please add comment