एकनाथ खडसे मला भेटले व आमची चर्चाही झाली. पण त्यांचं समाधान करण्याएवढी साधनसामुग्री सध्या तरी माझ्याकडं नाही,' असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसेंना धक्का दिला आहे.
भाजपवर
नाराज असलेल्या खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे पवारांची गुप्त
भेट घेतली होती. या भेटीमुळे खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला
हवा मिळाली होती.
मात्र पवारांनी दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या खडसेंनाच धक्का बसला आहे.
पवारांच्या या वक्तव्यामुळं आता खडसे नेमकी काय भूमिका घेणार, याकडं लक्ष लागलं आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment