राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या सोमवारी 30 तारखेला होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
तसेच मंत्रिमंडळ विस्तारावरून महाविकास घाडीत कोणत्याही पक्षात मतभेद नाही, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.
30 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटपही त्याच दिवशी होईल, असं भुजबळ म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 6 कॅबिनेट मंत्री फक्त मंत्रिमंडळात आहेत. शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे 2 असे 6 मंत्री आहेत.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून 10 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री असे प्रत्येकी 13 आणि काँग्रेसकडून 10 जणांचा समावेश मंत्रिमंडळ विस्तारात केला जाणार आहे.
गृहमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच असल्याचं बोललं जातंय. यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याची चर्चा आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment