नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता 31 डिसेंबर रोजी दर्शनासाठी श्री साई मंदिर रात्रभर खुले ठेवले जाणार आहे.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
श्री
साईबाबा संस्थानच्यावतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन
वर्षाचे स्वागतानिमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी
नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त
साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.
या
भाविकांना साईंच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा, या उद्देशाने 31
डिसेंबरला साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवले जाणार आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment