रायझोबिअम
जिवाणू बियाण्याला चोळल्यानंतर आपण ते बी जमिनीत लावतो. जर जमीन ओलसर असेल
तर हे जिवाणू बियाणांच्या सभोवताली थोड्या दिवसांसाठी वनस्पतीच्या
कुजलेल्या खतांवर जिवंत राहतात.
बियांपासून
त्याचे रोपात रुपांतर होते तेव्हा हे जीवाणू त्या मुळांच्याभोवती एकत्र
होतात, कारण या रोपांची मुळे काही प्रमाणात साखर, जीवनसत्वे, सेंद्रिय
आम्ले व वाढवर्धक पदार्थ जमिनीमधे सोडतात.
पिकांच्या
मुळाने जमिनीत सोडलेल्या वेगवेगळ्या पदार्थावर रायझोबिअम हे जिवाणू खुप
योग्य प्रकारे वाढतात त्यामुळे हे जिवाणू मुळाजवळच्या मातीमध्ये जास्त
प्रमाणात एकत्र येउन वाढतात.
पिकांची
मुळे वरील द्रव्याप्रमाणेच ट्रिप्टोफॅन नावाचा द्रव्य बाहेर सोडतात, तो
द्रव कालांतराने इंन्डोल अॅसिडमधे बदलतो. त्या द्रवामुळे मुळांवरती विकृती
निर्माण होते व मुळे वाकतात तर काही वेळा गोळा होतात.
जिवाणू
पेशी सुद्धा पाण्यात विरघळणारे विशिष्ट पॉलीशर्कराइड मुळांजवळ सोडतात.
मुळांच्या पेशीमधुन नंतर ते गाभ्यापर्यंत पोहोचतात व त्यामुळे काही
(पॉलीगॅलॅक्टोनेज) विकार तेथे तयार होतात.
वरील सर्व माहिती व फायदे लक्षात घेता कोणत्याही द्विदल वर्गीय पिकांना रायझोबियम चे कल्चर वापरणे अतिशय फायदेशीर ठरू शकते.
0 comments:
Post a Comment
Please add comment