हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी
पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले
आहेत. हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना
थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचे
पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. हैदराबादमध्ये
एका डॉक्टर प्रियांका रेड्डी वर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला जिवंत जाळून ठार मारण्याचा या चार
आरोपींवर आरोप होते. बलात्कार आणि हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण देशात
संतापाची लाट उसळली आहे.

हैदराबादच्या
पोलीस आयुक्तांनी या वृत्ताला दुरोरा दिला आहे. तपासादरम्यान या ४
आरोपींना पोलीस घटनास्थळी नेत होते. मात्र, दरम्यानच्या काळात हे चारही
आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत होते. त्यानंतर पोलिसांनी या चौघांनाही
थांबवण्यचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना दाद देत नसल्याचे पाहून शेवटी
पोलिसांनी चौघांवर गोळ्या झाडल्या यात या चौघांचा मृत्यू झाला. दरम्यान
पोलिसांच्या या कारवाईचे देशभरून कौतुक होत असून बलात्कार प्रकरणातील
आरोपींना अशाच प्रकारे शिक्षा दिली जावी अशी प्रतिक्रिया येत आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment