डिजिटल
पेमेंटसाठी आरबीआयने एक नवा पर्याय दिला आहे. त्यानुसार, प्रिपेड पेमेंट
इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) ही नवी डिजिटल पेमेंट सिस्टिम लॉन्च केली आहे.
याद्वारे खरेदी करणे सोपे होणार आहे.
देशात
आज पैशांचे व्यवहारासाठी डिजिटल पेमेंटचे विविध पर्याय आहेत. त्यात
युपीआय, नेटबँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड, एआयपीएस, मोबाईल वॉलेट, मोबाईल
बँकिंग आणि पीओएस मशीन आदींचा समावेश आहे.
पीपीआय
आहे काय ?
पीपीआय हे एक प्रिपेड अकाऊंट असणार आहे. हे अकाऊंट दर
महिन्याला रिचार्ज करता येणार आहे. त्यासाठी 10 हजार रुपयांची मर्यादा दिली
आहे.
हे अकाऊंट एकदा रिचार्ज झाले की त्याचा वापर आपण रोजच्या गरजेच्या वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी करता येणार आहे.
वैशिष्ट्य
यामध्ये आपणास फंड ट्रान्सफरची सुविधा मिळणार नाही. यातील पैसे फक्त वस्तू व सेवा खरेदीसाठीच वापरता येणार आहे.
▪ हे पेमेंट इन्स्ट्रुमेंट बँकेकडून वा सध्या अस्तित्वात असलेल्या नॉन बँकिंग पीपीआय प्लेअर्सकडून तयार करुन मिळू शकते.
या
कंपन्या ग्राहकांची माहिती व्हेरिफाय करुन त्यांना पीपीआय अकाऊंट सुरु
करुन देऊ शकतात. यासाठी मोबाईल क्रमांक व ओटीपी, त्याचबरोबर केवायसीसाठी
लागणारे कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक आहे.
पीपीआयमध्ये केवळ नोंदणीकृत मोबाईल क्रमांक जोडलेल्या बँक अकाऊंटमार्फतच
रक्कम जमा करता येणार आहे. हे अकाऊंट रिचार्जसाठी आरबीआयने वर्षाला 1 लाख
20 हजार रुपयांची मर्यादा घातली आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment