
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या निधीसाठी बँक खात्याशी आधार क्रमांक जोडणीची सक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना बँक खात्याशी आधार जोडणीसाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.
या अल्पमुदतीत आधारजोडणी न केल्यास जिल्ह्यातील सुमारे एक लाख 32 हजार शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दोन लाख 44 हजार 676 शेतकऱ्यांच्या खात्यात
ही रक्कम जमा झाली. तर, दुसऱ्या टप्प्यात एक लाख 96 हजार 770 शेतकऱ्यांना
या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
परंतु
या योजनेचा गैरवापर होत असल्यामुळे एक ऑगस्टपासून बँक खात्याशी आधार
जोडणीची सक्ती करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील एक लाख 32 हजार
शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
परंतु
त्यांनी बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न केलेला नाही. तसेच, काही
शेतकऱ्यांच्या बँक खाते आणि आधार क्रमांकावरील नावात साधर्म्य नाही.
या
कारणांमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने आधार जोडणीसाठी पुरेसा कालावधी वाढवून
द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment