पाकिस्तानात महागाईचा उद्रेक

                     http://www.gosip4u.com/2019/12/pakistan-news.html

पाकिस्तानची आर्थिक कंगाली ही आता जगासाठी काही नवीन राहिलेली नाही. एकिकडे पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट होत असताना महागाईनेदेखील तेथील जनतेच्या नाकीनऊ आणले आहेत.

पाकिस्तानात सध्या मूग डाळ ही 220 ते 260 रुपये, कडधान्य 160 रुपये प्रती किलो, साखर 75 रुपये प्रती किलो तर टोमॅटोचे दर 425 रुपये प्रती किलोपर्यंत पोहोचले आहेत.

पाकिस्तानचा महागाईचा दर 12.7 टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या नऊ वर्षातील हा सर्वाधिक दर आहे. पाकिस्तानमध्ये सध्या दैनंदिन अन्नपदार्थांचे दर गगनाला भिडले आहेत.

जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व सामान खरेदीवर रोख लावला आहे. भातातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो पाकिस्तान आयात करत होता. 

ऑगस्ट महिन्यापासून पाकिस्तानात टोमॅटोची टंचाई भासत असून, दर 400 रुपये प्रती किलोपर्यंत पोहोचले आहेत.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment