ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्स भारतात मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. भारतीय कंटेन्टवर 3 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हेस्टिंगस यांनी सांगितले.
हेस्टिंगस म्हणाले..
▪
भारतीय कंटेंटला जगभरातून पसंती दिली जात आहे त्यामुळे भारतीय कंटेंट येथे
डेव्हलप करून जगभरात तो पोहोचविण्याची योजना आम्ही तयार केली आहे.
▪ भारतात रेग्युलेटरी स्थैर्य आणि सेल्फ रेग्युलेशनची परवानगी आहे ही महत्वाची बाब आहे. भारतीय कथा खुपच छान असतात.
▪
लैला आणि सेक्रेड गेम्स सिरीज जगभर यशस्वी झाली असून लिटील भीम प्रसिध्द
भारतीय कॅरक्टर आहे. यावर बनलेली सिरीज जगभरातील 2.7 कोटी युजर्स पाहत
आहेत.
▪ मायटी लिटील भीम ब्राझील, कॅनडा आणि अन्य देशातही लोकप्रिय आहे. सध्या युके मधून सर्वाधिक कंटेंट निर्यात होत आहे.
दरम्यान,
नेटफ्लिक्सच्या भारतातील 199 रु. चा सबस्क्रिप्शन प्लॅनच्या माध्यमातून
जून 2020 पर्यंत 27 लाख नवे भारतीय युजर्स मिळविण्याचे ध्येय नेटफ्लिक्सने
ठेवले आहे, असेही हेस्टिंगस यांनी नमूद केले
0 comments:
Post a Comment
Please add comment