दिल्लीतील
शास्त्री भवन येथे काही दिवसांपूर्वीच 66 व्या राष्ट्रीय चित्रपट
पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. आज दिल्लीच्या विज्ञान भवन येथे हा
पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

'भोंगा'
या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला असून
इतर भाषिक चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर करण्यात आले
आहेत.
मराठीचा विशेष
सन्मान
'पाणी', 'नाळ', 'चुंबक', 'तेंडल्या', 'खरवस' आणि 'आई शप्पथ' या
मराठी चित्रपटांचा विविध श्रेणींमध्ये सन्मान केला जाणार आहे.
दरम्यान
देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव केला
जाणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि
अभिनेत्री दिव्या दत्ता करणार आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment