
महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होऊन विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले तरी अजूनही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.
शिवसेना
व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिपदासाठीच्या याद्या तयार असून फक्त
काँग्रेसची यादी तयार नसल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याची माहिती
मिळत आहे.
काँग्रेसचं
भिजत घोंगडं : काँग्रेसच्या अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना
मंत्रिमंडळात येण्याची इच्छा आहे. परंतु यापैकी फक्त अशोक चव्हाण यांचा
मंत्रिमंडळात समावेश होणार असून पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्षाची
जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
यांचीही नवे चर्चेत : काँग्रेसकडून मंत्रिपदासाठी विभागवार खालील आमदारांचीही नावे चर्चेत आहेत.
▪ विदर्भातून सुनील केदार, यशोमती ठाकूर, विजय वड्डेटीवार
▪ मराठवाड्यातून अमित देशमुख, अशोक चव्हाण
▪ पश्चिम महाराष्ट्रातून विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे
▪ उत्तर महाराष्ट्रातून के. सी. पाडवी
▪ मुंबईतून वर्षा गायकवाड, अमीन पटेल
दरम्यान,
काँग्रेसकडून मंत्रिपदासाठीची नावं निश्चित होईपर्यंत तरी महाविकासआघाडी
सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment