महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षात बंडखोरी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, बुधवारी भाजप नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या भेटीला महत्त्व गृहीत धरले जात आहे कारण दोन्ही नेते पक्षातील अनेक गोष्टींबाबत खूश नसल्याचे संकेत पाठवत आहेत.
पण भाजप नेते राम कदम यांनी हि केवळ एक अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांच्या कारस्थानामुळेच झाला आहे, असा खळबळजनक आरोप करतानाच पक्ष नेतृत्वाकडे याबाबतची तक्रार केली असून त्यावर कारवाई होईल, अशी आशा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.
पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव करून राज्यातील ओबीसी नेतृत्व मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुजन समाजाला डावलण्यासाठीच हे कारस्थान करण्यात आलं आहे. या पराभवामुळे राज्यातील ओबीसी नेतृत्वही हरपले आहे, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली. पक्षातील कोणत्याही अंतर्गत घडामोडींना पक्ष दोषी नसतो, तर पक्ष नेतृत्व दोषी असते, असा टोलाही त्यांनी लगावाला.
आज खडसे यांच्या घरी भाजप नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
0 comments:
Post a Comment
Please add comment