आपल्या प्रत्येकाचं इंटरनेटशी नातं तसं घट्टचं. पण इंटरनेट वापरताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण आपल्या नकळत कुणी आपला गैरफायदा देखील घेऊ शकते आणि त्याची आपल्याला कल्पना देखली नसते. म्हणून खालील गोष्टींवर बारकाईने विचार करा...
1) कुठल्याही अनोळखी ई-मेलला प्रतिउत्तर (Reply) देऊ नका.
2)
व्हायरस अलर्टचा अनोळखी व्यक्तीकडून आलेला ई-मेल आपल्या मित्रमैत्रीणींना
पाठवू (Forward) नका. कारण बर्याच वेळेस अशाच ई-मेलमध्ये व्हायरस असतो.
3) आपला पासवर्ड विचारणाऱ्या कुणाच्याही ई-मेलला आपला पासवर्ड ई-मेलद्वारे सांगू नका.
4) आपल्या बँकेची अथवा बँक खात्याची माहिती विचारणाऱ्या कुठल्याही ई-मेलला माहिती देऊ नका.
5) व्हायरसची सुचना देणाऱ्या वेबसाइट पाहू नका. अशा वेबसाइट आपल्या न कळत आपल्या कॉम्प्युटरमधून माहिती चोरत असतात.
6)
इंटरनेटवरुन कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना अथवा एखादे संकेतस्थळ
पाहताना जर स्क्रिनवर समोर OK अथवा Cancel असे विचारणारा संदेश असलेला
चौकोन आल्यास ती सुचना अथवा संदेश व्यवस्थित वाचून मगच OK अथवा Cancel या
बटणावर क्लिक करावे. कारण बर्याच वेळेस अशा अचानक विचारल्या गेलेल्या
विंडोद्वारे आपल्या कॉम्प्युटरमध्ये नको असलेले एखादे निराळेच सॉफ्टवेअर
अथवा इंटरनेट एक्सप्लोररमध्ये Address Bar च्या खाली त्यांच्या जाहिरातीचे
Tool Bar जमा होतात.
7)
आपण जर आपल्या बँकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन बँकिंग सेवा वापरत असाल तर दर
वेळेस न विसरता त्या संकेतस्थळावरुन Sign Out अथवा Log Out केल्यानंतर
ब्राऊझरची History (संकेतस्थळ पाहिल्याची नोंद) क्लिअर म्हणजेच नष्ट करावी.
8)
निरनिराळ्या संकेतस्थळांवर निरनिराळे अनेक युजरआयडी असल्यास बरेच लोक त्या
सर्वांना एकच सोयीने लक्षात राहिल असा पासवर्ड देणे पसंत करतात पण
अशावेळेस जर आपण आपल्या पासवर्डमध्ये सुरुवातीला अथवा शेवटी # अथवा $
यापैकी कोणताही एक चिन्ह वापल्यास आपला पासवर्ड बर्यापैकी सुरक्षित होईल.
0 comments:
Post a Comment
Please add comment